spot_img
ब्रेकिंग“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह देखील मैदानात उतरले आहेत. आज सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीसह शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी दहा वर्षे सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय दिले हे सांगावं, असे अमित शाह यांनी म्हंटले आहे.

“मी लोकसभेलाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे की, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचे आहे. राज्यात महायुतीचे सरकार बनवा. हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचे काम करतील”, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

अमित शाह म्हणाले की, “मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कलम ३७० हटविले. संपूर्ण देशाने याला पाठिंबा दिला. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार याला विरोध करत आहेत. मी आज शरद पवार यांना आव्हान देतो की, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत.”

शरद पवार राम मंदिर झाल्यानंतर आयोध्येत अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. कारण त्यांना आपली मतपेटी सांभाळायची आहे. म्हणून ते राम मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. पण आम्ही त्यांच्या मतपेटीला घाबरत नाहीत,” असा इशारा यावेळी अमित शाह यांनी दिला.

“महाविकास आघाडीवाले वक्फ बोर्डाकडे जमीन देण्याचं काम करतील. पण जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत मंदिर आणि मंदिराच्या जमिनीला कुणाला हात लावू देणार नाही. आघाडीवाले आपली वोट बँक टिकवण्याचे काम करत आहेत. वक्फ बोर्डासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे त्यांची वोट बँक कोण आहे समजलं का? आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवतील. शरद पवार आपल्या मुलीला मुख्यमंत्री करणार आहेत,” असेही यावेळी अमित शाह म्हणाले.

“काँग्रेसमध्ये तर डझनभर लोक कपडे शिवून तयार आहेत, पण भाजपमध्ये असं होतं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितले की जी आश्वासन दिली जातात ते जपून करा. कारण काँग्रेस कधीही आश्वासन पूर्ण करत नाही, पण आम्ही जे शब्द देतो ते पूर्ण करतो, ” असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...