spot_img
अहमदनगरनगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा...

नगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा…

spot_img

संदेश कार्ले | गावात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी जाब विचारावा
पारनेर | नगर सह्याद्री- 
पक्ष पाहुन मतदान करण्यापेक्षा त्या उमेदवाराचे मतदारसंघाबाबतचे नेमके व्हिजन काय आहे? हे पाहुनच मतदारांनी मतदान करावे. आपल्या गावात आलेल्या प्रत्येक उमेदवाराला केलेल्या कामांचा जाब विचारावा असे आवाहन पारनेर -नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी केले आहे. दरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे पाठबळ असल्याने नगर-पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळणार असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी पारनेर-नगर मतदारसंघातुन उध्दव ठाकरे शिवसेनेकडुन उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेला डावलल्याने सेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण अपक्ष म्हणुन मैदानात उतरल्याचे त्यांनी जाहिर केले. अहिल्यानगर तालुयामधील खंडाळा गावात समर्थकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पारनेर मतदारसंघ शिवसेनेच्या पाठिशी उभा राहणारा आहे. या मतदार संघाला संघर्षशिल आमदाराची गरज आहे. शिवसेनेच्या माध्यमातुन आता पर्यत दूध प्रश्न, शेतीमालाच्या बाजार भाव, कांदा प्रश्न, वीज प्रश्न अशा विविध प्रश्नावर आंदोलन करून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

दुष्काळी नगर तालुयात घोसपुरी योजनेसारखी पाणी योजना पथदर्शीपणे चालवुन नफ्यात आणली. यापुढे शेतकर्‍यांसाठी लढा उभा करण्यासाठी त्यांचे प्रश्न घेऊनच मी मैदानात उतरलो आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी शेतकरी, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले याचा जाब त्यांना गावात प्रचाराला आल्यावर विचारावा. ते पुढे म्हणाले की, नगर तालुयातील सर्वपक्षीय कार्यकर्ते पाठिशी आहेत. यामुळेच पुर्ण ताकदीने हि निवडणुक लढणार आहे. जिल्हा परिषद सदस्य पद व पंचायत समितीचे सभापती पद भुषविले आहे. त्यामुळे नगर तालुयातील प्रत्येक गावांमध्ये कार्ले यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पारनेर तालुयातही चांगला प्रतिसाद मिळत असुन यंदा परिवर्तनाची लाट उसळणार असल्याचे कार्ले यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...