spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच कौतुक नको..कोल्हे-थोरातांवर मोठा...

Ahmednagar Politics : कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच कौतुक नको..कोल्हे-थोरातांवर मोठा घणाघात

spot_img

राहाता / नगर सह्याद्री :
Ahmednagar Political News : संगमनेर आणि संजीवनीने गणेश परिसरातील ऊस लुटून नेला तेव्‍हा बघ्‍याची भूमिका का घेतली? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहारे यांनी केला आहे. कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच्‍या कौतुकाचे गोडवे गाण्‍यापेक्षा गणेश कारखान्यात गुंवणूक करण्याचा आग्रह थोरात आणि कोल्हेंकडे धरावा असे आवाहनही त्‍यांनी मंत्री सखे यांच्यावर टीका करणाऱ्यांना केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात लहारे यांनी म्‍हटले आहे की, गणेश कारखाना बंद पडल्‍यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरश: लुटून नेला तेव्‍हा आपल्‍या नेत्‍यांना गणेश कारखान्‍याची काळजी वाटली नाही. तुम्ही देखील पाहत राहिलात. तुमच्‍या नेत्यांच्या कार्यकर्तृत्‍वामुळेच बंद पडलेल्‍या गणेश कारखान्‍यातील कामगार आणि ऊस उत्‍पादकांची वाताहत झाली,

कारखान्‍यावर ७५ कोटींहून अधिक रक्‍कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला? कामगारांच्‍या ४२ महिन्‍यांच्‍या पगाराचे काय झाले? काळाकुट्ट आंधार ज्यांनी गणेश कारखान्याच्या नशिबी आणला याचे दुःख सुज्ञ सभासदांना आणि कामगारांना अजूनही आहे. त्यामुळे आम्ही आनंद देत असल्याची तुमच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे ‘बडा घर पोकळ वासा’ असल्याचा टोला लहारे यांनी लगावला.

बंद पडलेला कारखाना कोल्‍हे पॅटर्नने तुमचे नेते सुरु करु शकले असते, परंतू कारखाना पुन्‍हा सुरु व्‍हावा ही इच्‍छाच नव्‍हती. उलट कोल्हे पॅटर्न सभासदांच्या माथी मारून सभासदांना दोन वर्षे भाव कमी घ्यायला लावला. कामगारांना २० टक्के पगार कमी दिले आणि कारखाना बंद पाडल्यानंतर मशिनरी खोलून कोणी नेले याचा सोयीस्कर विसर तुम्हाला आता पडला असल्याचे लहारे म्हणाले.

कारखाना सुरू होण्यापेक्षाही कार्यक्षेत्रातील ऊसावर संगमनेर आणि संजीवनीचा अधिक डोळा होता. त्‍यामुळे गणेश कारखान्‍यावरील तुमच्या नेत्यांचे  बेगडी प्रेम उघड झाले. आज तुमच्‍या नेत्‍यांनी गणेश कारखान्याच्या बाबतीत कळवळा दाखविण्‍यास केलेली सुरुवात ही सभासदांच्‍या डोळ्यात धुळफेकच असल्याची टिका करून, संगमनेर आणि संजीवनीच्‍या नेत्‍यांच्‍या कौतुकाचे गोडवे तुम्‍ही गात असला

तरी, त्‍यांनी कारखाना चालविण्‍यासाठी स्‍वत:ची किती गुंतवणूक केली याचे आकडे एकदा जाहीर करा असे आवाहन लहारे यांनी दिले. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी २३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना अद्यावत केला.करारात नसतानाही १ हजार निवृत कामगारांना ११ कोटी रुपयांची देणी अदा केली.

विखेंच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षे गणेश कारखाना यशस्‍वीपणे सुरु राहीला. आधूनिकीकरण करुन गाळप क्षमताही ३ हजार टनापर्यंत नेली. संचालक मंडळाच्‍या निवडणूकीत मिळालेल्‍या विजयाने फार हुरळून जावू नका. कारण २०११-१२ या तुमच्या नेत्यांच्या कार्यकाळातील फरकाचे पेमेंट २ कोटी रुपये अद्यापही ऊस उत्पादकांना मिळालेले नाहीत अशी आठवण लहारे यांनी पत्रकात करून दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...