spot_img
अहमदनगरआमदार बाळासाहेब थोरात यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार

आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री : आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटना व स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

कॉम्रेड गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार लहू कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ.डॉ. सुधीर तांबे, माजी आ भाऊसाहेब कांबळे, ॲड. भाऊसाहेब लांडगे, साधना गायकवाड, कॉ. स्मिता पानसरे, करण ससाने, बी.डी. पाटील, लक्ष्मण निंबाळकर, हेमंत ओगले, रावसाहेब थोरात, गंगाधर चौधरी, सचिन गुजर, बन्सी सातपुते, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.

आ.बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉ. माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माझ्यासाठी जीवनातील अविस्मरणीय आहे. कॉम्रेड गायकवाड यांनी खंडकरी शेतकऱ्यांचा सुरू केलेला प्रश्न मला माझ्या कार्यकाळात सोडवता आला  हे मी माझी मोठे भाग्य समजतो.

खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटपाचा प्रश्नाला त्यावेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या. सुप्रीम कोर्टात हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला असला तरी वाटपाचा मोठा प्रश्न होता. मात्र स्व. जयंतराव ससाणे यांनी सर्व नियम  सांभाळून जमीन वाटवाबाबत मदत केली. त्यांनी न भूतो न भविष्यती असा मोठा कार्यक्रम श्रीरामपूर घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. शेतकरी सर्वसामान्य माणूस यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठीच आपण कायम काम केले असून या पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याची ते म्हणाले.

तर कॉम्रेड भालचंद्र कांगो म्हणाले की, आ. थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे. महाराष्ट्राचे आदर्श कृषी व महसूल मंत्री म्हणून त्यांचे नाव कायम स्मरणात राहील. त्याचबरोबर देशात सध्या भांडवलदारांना पोषक राजकारण होत असून वन नेशन वन इलेक्शनच्या नावाखाली लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचे काम काही लोक करत आहेत. लोकशाहीला वाचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीची स्थापना झाली असल्याचीही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...