spot_img
अहमदनगरभ्रष्टाचार मुक्तीसाठी माजी सैनिकांचा पुढाकार गरजेचा, अण्णा हजारेंचे मोठे आवाहन

भ्रष्टाचार मुक्तीसाठी माजी सैनिकांचा पुढाकार गरजेचा, अण्णा हजारेंचे मोठे आवाहन

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : देशसेवेबरोबरच समाज बदलण्याची ताकद सैनिकांमध्ये आहे. भ्रष्टाचार मुक्त भारताच्या निर्मितीसाठी माजी सैनिकांचा पुढाकार गरजेचा आहे असे प्रतिपाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धी येथे देशातील माजी सैनिकांच्या विविध संघटनाच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला देशभरातून ६०० माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. सभेस प्रामुख्याने डॉक्टर मुरुडकर व्हॉइस चांन्सलर मुंबई युनिव्हर्सिटी , वीर सिंग चव्हाण हरियाणा, चरण सिंग पंजाब, देवसेना झारखंड, रामचंद्र यादव दिल्ली, संत शिरोमणी शिवानंद स्वामी, संजय शिरसाठ,

पोपटराव दाते आदींसह देशभरातील माजी सैनिक प्रतिनिधी उपस्थित होते. माजी सैनिकांना संबोधित करताना अण्णा हजारे म्हणाले, मजबूत संघटनेशिवाय कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. समाजासाठी आजपर्यंत जे काही थोडेफार करू शकलो ते संघटनेमुळेच. मात्र असे संघटन केवळ संख्यात्मक नको तर गुणात्मक असायला हवे. माणसे आनंदासाठी धावपळ करीत असतात. पण ते आनंदाचा शोध बाहेर घेतात.

खरा आनंद बाहेर नाही तो आपल्या आतमध्येच असतो आणि तो केवळ निष्काम सेवेतून मिळतो. देशात दरवर्षी ७० ते ८० हजार सैनिक निवृत्त होतात. या सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. भ्रष्टाचार मुक्त भारताच्या निर्मितीसाठी माजी सैनिकांचा पुढाकार गरजेचा असून समाजासाठी जगण्याची आणि समाजासाठीच मरण्याची तयारी अशा नेतृत्वाने ठेवायला हवी.

हे काम माजी सैनिक नक्कीच करू शकतात असा विश्वास हजारे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सैनिक संघटनेचे नारायण अंकुशे यांनी केले व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनीही यावेळी सैनिकांना मार्गदर्शन केले. मारुती पोटघन यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब नरसाळे यांनी आभार मानले. दादासाहेब पठारे, सुभाष ठुबे पाटील, भगवानराव कोल्हे, अंबादास तरटे, संदिप गट, कचरू शिंदे, प्रकाश ठोकळ आदी मान्यावर यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...