spot_img
अहमदनगरयंदाचा मान अहमदनगरकरांना : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे युवा नाट्य आणि साहित्य संमेलन...

यंदाचा मान अहमदनगरकरांना : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे युवा नाट्य आणि साहित्य संमेलन अहमदनगरमध्ये

spot_img

संमेलनाच्या निमंत्रकपदी जयंत येलुलकर यांची नियुक्ती
अहमदनगर / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने या वर्षी होणारे साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित समजले जाणारे राज्यस्तरीय युवा साहित्य आणि नाट्य संमेलन आयोजीत करण्याचा मान अहमदनगरला मिळाला असून पुणे येथे नुकत्याच झालेल्या म सा प चे कार्याध्यक्ष श्री मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर यांनी दिली.

मराठी भाषेची पालक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राज्यात विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये युवा साहित्य आणि नाट्य संमेलन हा महत्वाचा भाग समजला जातो. म.सा.प च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत येलुलकर यांनी हे संमेलन अहमदनगर येथे भरविले जावे अशी आग्रही मागणी केली.त्यांच्या या मागणीला मंडळांच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. अहमदनगरला प्रथमच या संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळतं आहे.
बैठकीचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी म्हणाले की, यावर्षीचे हे संमेलन भरविण्याचा मान नगरला सर्वानुमते मिळाला असून यापूर्वी देखील म.सा.प च्या सावेडी उपनगर शाखेने स्वागताध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. आदर्श,उत्कृष्ठ नियोजन अन् कायम लक्षात राहिल अशा यशस्वी संमेलनाचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता.

संमेलनाच्या निमंत्रकपदी सर्वानुमते येलुलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून अहमदनगर येथे होत असलेले युवा साहित्य आणि नाट्य संमेलन साहित्य क्षेत्राला नवी दिशा देणारे असेल असा विश्वास देखील जोशी यांनी संमेलनाच्या आयोजनाचे पत्र देताना व्यक्त केला.

यावेळी म. सा. प च्या प्रमूख कार्यवाह श्रीमती सूनिताराजे पवार,कोषाध्यक्ष श्री.विनोद कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले व शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी सर्वश्री ऍड.प्रमोद आडकर, राजन लाखे,प्राचार्य तानसेन जगताप,रवींद्र बेडकिहाळ,व सर्व जिल्हा प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

येलुलकर यांनी अहमदनगरला हे संमेलन आयोजीत करण्याचा बहुमान दिल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे आभार मानले. या शहराला साहित्याची मोठी परंपरा आहे. सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळे हे संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करू यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे येलुलकर यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी...

अर्बन बँक घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ ची एन्ट्री; चौकशी करणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी...

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...