spot_img
अहमदनगरराज्‍याला प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍याला प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात असा संदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला. ६५ व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या निमित्‍ताने पोलिस परेड मैदानावर ध्‍वजवंदनाचा सोहळा संपन्‍न झाला.

याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्‍त पंकज जावळे यांच्‍यासह जेष्‍ठ नागरीक आणि विविध क्षेत्रातील मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी पोलिस पथकाच्‍या संचलनाची पाहाणी करुन, मानवंदना स्विकारली.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महाराष्‍ट्राने नेहमीच सर्व जाती, धर्म, पंथ यांना सामावून घेत एकसंघपणे वाटचाल केली आहे. राज्‍याच्‍या भूमीने स्‍वातंत्र्य संग्रामातही मोठे योगदान दिले. सामाजिक क्रांतीच्‍या विचाराने नेहमीच एकतेचा विचार घेवून वाटचाल करणा-या राज्‍याने संत विचारांचे अधिष्‍ठान कायम ठेवले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था कृषि आणि सहकारावर अवलंबुन आहे. यामुळे सामाजिक परिवर्तनात मोठी क्रांती झाली. स्‍व.यशवंतराव चव्‍हाण यांनी महाराष्‍ट्राला विकासाचा मंगल कलश आणतांना सर्वांना समान संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या. त्‍यानुसार राज्‍याची वाटचाल सुरु असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....