spot_img
आरोग्यअंजीर सारखं दिसणार 'हे' रानटी फळ गुणकारी!! 'या' आजारांसाठी फायदेशीर

अंजीर सारखं दिसणार ‘हे’ रानटी फळ गुणकारी!! ‘या’ आजारांसाठी फायदेशीर

spot_img

नगर सहयाद्री टीम-
उत्तम आरोग्यासाठी आहारात पाले भाज्यांइतकेच फळांनाही महत्त्व आहे. बदलत्या ऋतूनुसार फळेही बदलत जातात. फळे शरीराला अनेक जीवनसत्त्वे, भरपूर पाणी आणि फायबर प्रदान करतात. आंबा, केळी, द्राक्ष, डाळींब असे मुख्य फळ पाहिली असाल परंतु तुम्ही ‘तिमला’ नावाचे फळ कधी पहिले का? उत्तराखंडच्या डोंगररांगांमध्ये हे फळ पहावयास मिळते. तिमला ही अंजीराची जंगली प्रजाती आहे. अंजीर हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक फळ मानले जाते.

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात हे फळ तिमल, तिमिल, तिमालू या नावांनी ओळखले जाते. या भागात या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. याचे औषधी उपयोगही आहेत. या फळामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि बी असतात. या फळाची भाजी किंवा लोणचे तयार केले जाते. एप्रिल ते जून या कालावधीत या भागात हे फळ उपलब्ध असते. हिरवी पिवळी, लाल शिजवलेले तिमला फळ खूप गोड असते. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात याची भाजी आणि रायतान खूप लोकप्रिय आहेत.

या फळात औषधी गुणधर्म आहेत. आंबा आणि सफरचंदच्या तुलनेत या फळामध्ये चरबी, प्रथिने, फायबर आणि खनिजे जास्त असतात. ८३ टक्के साखर असते, ज्यामुळे ते जगातील सर्वात गोड फळ बनते. मधुमेहाच्या रुग्णांनाहे फळ खाल्याने काही खास फायदे मिळतात. हे फळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...