spot_img
अहमदनगरगेली पन्नास वर्षे विखे परिवाराने नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले: आ. लंके

गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले: आ. लंके

spot_img

टाकळीढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रा
पारनेर | नगर सह्याद्री
गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने संपूर्ण नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले. पारनेरसह नगर, पाथर्डी तालुयात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या. मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत अशी टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या. आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे, मी सोपा नाही, लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल, असे आ. लंके यांनी ठणकावून सांगितले. मला विधानसभेत पाठविल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

साडेचार वर्षांच्या कालखंडात सर्वाचे समाधान करू शकलो नसलो तरी संपूर्ण कार्यकाळात रात्रंदिवस परीश्रम घेतले. मतदार संघाला न्याय देण्यासाठी अथक आणि प्रामणिक प्रयत्न केले. प्रत्येक गावात किमान एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची घडी बसलेली असतानाही लोकसभेसाठी विधानसभेचा राजीनामा दिला.आपण मांडलेला डाव मोडला. आता डाव पुन्हा सावरायचा असल्याचे सांगत भावनिक आवाहन लंके यांनी केले.

तालुयातील काही असंतुष्ट आत्मे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. माझा तुमच्यावर व तुमचा माझ्यावर अधिकार आहे.लोकसभा निवडणुकीत आपण झेंडा लावणारच,
आपले नाव देशात होणार आहे. धोका पत्करून आपण पुढे जात आहोत. समोरचा कडा पार करून झेंडा रोवायचा आहे. तालुयातील जनतेच्या हाती मताधिय आहे. किमान एक लाखांची आघाडी मिळाली पाहिजे. विरोधक इतर तालुयात जाऊन तालुयात लंके यांना लिड मिळणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत कारण इतर तालुयातही त्यांना प्रतिसाद मिळत नाही असे आ. नीलेश लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...