spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीचा 'हा' बडा नेता अखेर भाजपच्या गळाला लागला..शरद पवारांना धक्का

राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अखेर भाजपच्या गळाला लागला..शरद पवारांना धक्का

spot_img

रायगड / नगर सहयाद्री : महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी आली आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. एक मोठा नेता माजी आमदार शरद पवारांना सोडून भाजपात दाखल होत आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे अजित दादांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय होते.

मात्र, अलीकडे त्यांच्यातील स्नेह कमी झालता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुरेश लाड तटकरे यांच्यासोबत नसून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहिले. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जतमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने रायगड जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील होण्यापूर्वीच भाजपने तटकरे यांच्या निकटवर्तीयांना भाजपमध्ये सामावून घेऊन त्यांना शह देण्याची सुरुवात केली होती.

तटकरे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या सुकन्या असलेल्या पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेच्या यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेकापचे नेते धैर्यशील पाटील यांनाही यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, उद्धव ठाकरे व शेकापचे नेते जयंतभाई पाटील एकत्र येत तटकरे यांच्या विरोधात रणशिंग फुकले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...