spot_img
राजकारणमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचाच 'हा' मोठा नेता बंडाच्या तयारीत? मोठी बातमी समोर

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचाच ‘हा’ मोठा नेता बंडाच्या तयारीत? मोठी बातमी समोर

spot_img

नगर सह्याद्री / राजस्थान :
सध्या भाजपची विजयी घौडदौड सुरु आहे. तीन राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर भाजप महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन करेल असे सांगण्यात येत आहे. तसा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान एक राजकीय बातमी आली आहे. भारतीय जनता पार्टीने राजस्थानात मोठा विजय मिळवला. परंतु येथे मुख्यमंत्रीपदावरून खलबते सुरु आहेत. दिल्लीपासून जयपूरपर्यंत बैठका सुरु आहेत.

वसुंधरा राजे स्वत: दिल्लीत गेल्या असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासोबत त्यांची भेट होऊ शकते, अशी चर्चा आहे. वसुंधरा राजे राज्याच्या बाहेर आहेत, पण तिथे राज्यात दुसराच खेळ सुरु झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

सुरवातीला अशी माहिती फिरत होती की, भाजपाच्या 7 आमदारांना हॉटेलमध्ये थांबवून हायकमांडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु एका प्रासिद्ध मीडियाच्या हाती आलेल्या वृत्तानुसार हॉटेलमध्ये थांबलेल्या 7 पैकी एक आमदार ललित मीणा आणि त्यांचे वडील हेमराज मीणा यांच्याशी त्या मीडियाने ने चर्चा केली.

वसुंधरा राजे आणि त्यांचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांच्या सांगण्यावरुन आमदारांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं होतं, असं हेमराज मीणा यांनी सांगितल आहे. वसुंधरा यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांनी 7 आमदारांना सांगितलं होतं की, कोणीही पक्ष कार्यालयात जायच नाही. सगळे हॉटेलमध्येच थांबतील. 7 आमदारांना हॉटेलमध्ये थांबवणं, हे त्रासदायक आहे, असं हेमराज मीणा यांनी सागितलं.

हे पक्ष विरोधी पाऊल आहे का? त्यावर हेमराज मीणा यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. “हे पक्षशिस्ती विरोधात आहे किंवा नाही, हे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह सांगू शकतील” असं हेमराज वीणा म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....