spot_img
आरोग्यचीनचा लहान मुलांना बाधित करणारा 'तो' व्हायरस भारतात आलाय? भारत सरकारने केले...

चीनचा लहान मुलांना बाधित करणारा ‘तो’ व्हायरस भारतात आलाय? भारत सरकारने केले स्पष्ट

spot_img

नगर सह्याद्री / दिल्ली
चीनमधील लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या रहस्यमयी निमोनिया बॅक्टेरियाची आता अनेक देशांनी दहशत घेतली आहे. कोरोनाच्या धुमाकूळ नंतर आता भारतसह अनेक देशांनी याबाबत सतर्कता बाळगली होती.

दरम्यान मध्यंतरी या बॅक्टरीयाचे भारतात सात रुग्ण सापडले असे वृत्त आले होते. त्यामुळे भारतात खळबळ उडाली होती. परंतु आता भारत सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेतलेल्या न्युमोनियाच्या रुग्णांचा चीनमधील आजाराशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मदेह एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळले. एम्सने पीसीआर आणि आयडीएम-एलिसाच्या दोन चाचण्यांद्वारे चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या लहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजारास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाची सात प्रकरणे नोंदविली आहेत.

लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर चाचणीद्वारे एक रुग्ण आढळला, तर उर्वरित सहा प्रकरणे आयजीएम एलिसा चाचणीद्वारे आढळली.

परंतू भारत सरकारने यावर खुलासा करत AIIMS दिल्लीमध्ये बॅक्टेरियाची प्रकरणे आढळल्याचा दावा करणारे मीडिया अहवाल दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत असे म्हटले आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हे समुदाय-अधिग्रहित न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जिवाणू आहेत.

एम्स दिल्लीतील न्यूमोनिया प्रकरणांचा चीनमधील मुलांमध्ये श्वसन संक्रमणाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...