spot_img
अहमदनगरहे वागणं बरं नव्हं! शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच गिरवले लाच घेण्याचे धडे, नेमकं काय...

हे वागणं बरं नव्हं! शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच गिरवले लाच घेण्याचे धडे, नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला ४५ हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार (वय 53) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीअशी: तक्रारदार यांची पत्नी सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे उप-शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या पत्नीची सन २०१५ ते २०२२ या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम १ लाख ६२ हजार ३६७ रुपये मिळाली.

तक्रारदार यांच्या पत्नीस वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पवार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने काल दि. १२ जून रोजी सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे संगीता पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५० हजार रुपयाची लाच मागणी करुन तडजोडीअंती ४५ हजार रुपयाची लाच मागितली.

ठरलेल्यानुसार शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह, श्रीरामपूर येथे लोकसेविका पवार यांच्याविरुद्ध सापळा लावण्यात आला. दरम्यान पवार यांनी यातील तक्रारदाराकडून पंचासमक्ष ४५ हजाराची लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...