spot_img
ब्रेकिंगशरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर? 'या' उमेदवारांच्या नावाची घोषणा..

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर? ‘या’ उमेदवारांच्या नावाची घोषणा..

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाते आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने एस या समाज माध्यमावर पोस्ट करत दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार सातार्‍यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे आज भाजपाकडूनही सातार्‍यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शयता आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी ३० मार्च आणि ४ एप्रिल रोजी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.

त्यानुसार वर्धेतून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...