नगर सह्याद्री टीम-
कँसरच नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. हा आजार ही तसाच भयंकर आहे. वेळेत इलाज झाला नाही तर तो जीव घेतो. शरीरात कँसर फार हुळू हळू वाढतो. बऱ्याचदा त्याची लक्षणंही दिसत नाही. कँसर झाल्यावर पेशींची वाढ असामान्य पद्धतींनी होते. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे काही गावरान आहार घेण्याचेही गरजेचे असते.
पावसाळ्यात अनेक रानभाज्या मिळतात. या वनभाज्यात पौष्टिक तत्व असतात त्यामुळे काही घातक रोगही दूर राहतात. अशीच एक बहुगुणी रानभाजी आहे काटोले. काटोल्याला काही ठिकाणी गोड कारले किंवा कंटोळही म्हणतात. कारले न खाणाऱ्यांसाठी कारल्यातले औषधी गुणधर्म प्राप्त करण्याकरता काटोल खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
शरीरातील वाढलेल्या वाईट रॅडिकल्स हे कॅन्सरचे एक मोठे कारण आहेत. काटोल्यातील औषधी तत्व हे रॅडिकल्स नियंत्रणात आणतात. काटोल्यातले ‘ल्युटिन’ सारखे केटोनोइड कॅन्सरच्या प्रतिबंधास मदत करतात म्हणून कॅन्सर होऊ नये यासाठी काटोले खावेत.
काटोल्यात भरपूर फायबर आहे, त्याने पचन सुधारते. अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या विकारावर काटोले गुणकारी आहे. पचनयंत्रणा सुधाराते. यात प्रोटीन, फाइटोकेमिकल्स, मोमोरडीसीन, ॲन्टी-ऑक्सिडेट आहेत. काटोले खाल्ल्याने हृदय आणि डोळ्याच्या आजारात फायदा होतो.