spot_img
देशराज्यातील ‘या’ खासदारांची लॉटरी लागणार! मंत्रीपदाच्या शपथेसाठी कुणाकुणाला आले फोन? पहा एका...

राज्यातील ‘या’ खासदारांची लॉटरी लागणार! मंत्रीपदाच्या शपथेसाठी कुणाकुणाला आले फोन? पहा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. बहुमत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे आहे. एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमुखाने निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी महात्मा गांधींच्या समाधी राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी गेले. मोदींनी अटल स्मृती स्थळावर जाऊन आदर व्यक्त केला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना आदरांजली वाहिली असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

मात्र, त्यापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना फोनाफोनी सुरू झाली आहे. यात महाराष्ट्रातून भाजपमधील नितीन गडकरी, शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव तर उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या नवनिर्वाचित खासदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील दिल्लीतून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत मंत्रीपदाच्या शपथेसाठी आतापर्यंत ‘यांना’ आले फोन
जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा, जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल, अनुप्रिया पटेल, अपना दल, डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी, के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी, नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी, राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी, अमित शाह, भारतीय जनता पार्टी, अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी, राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड, एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर, सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन,चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी, पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड), पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी, ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी, प्रतापराव जाधव, शिवसेना, कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी, रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी, रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड), मनोहरलाल खट्टर, भाजप, राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी, सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी, ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी, मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी, किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी, बंडी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी, गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी, रवनीत बिट्टू यांना भारतीय जनता पार्टी फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...