spot_img
अहमदनगरआरोपात तथ्य नाही; मानहानीचा दावा दाखल करणार, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांनी फेटाळले आरोप!

आरोपात तथ्य नाही; मानहानीचा दावा दाखल करणार, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांनी फेटाळले आरोप!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि खोटे आहेत. व्हायरल व्हिडिओ माझ्याच इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर मी स्वतः पोस्ट केला होता. कुटुंबीय कार्यक्रमात एक मिनिट डान्स केल्यास त्यात चुकीचे काय? असा प्रतिप्रश्न करत चांगल्या कामामुळे काही विरोधक बदनामीचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करत त्यांनी तृप्ती देसाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी अत्यंत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिनकर यांनी पदाचे आमिष दाखवून काही महिलांना बिअर बार व धाब्यावर बोलावल्याचा, तसेच नाचायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, नितीन दिनकर यांनी या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

तृप्ती देसाई यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ हा कोणताही आक्षेपार्ह प्रकार नसून, भाचीच्या वाढदिवसाचा घरगुती कार्यक्रमातील तो व्हिडिओ माझ्याच इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर स्वतः पोस्ट केला असल्याचे सांगितले. तसेच, १४ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ आता पुढे करून स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी तृप्ती देसाई हे बदनामीचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून पक्षसंघटन, समाजसेवा आणि जनसंपर्क यामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत आहे. पक्षसंघटन बळकट करत असून, विविध सामाजिक आणि विकासकामांमध्ये सक्रिय आहे. राजकीय त्रास देण्यासाठी आणि  प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. प्रामाणिक कार्याचा जनतेलाही विश्वास आहे. लवकरच सत्य उजेडात येईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राजकारणात आजपर्यंत एकनिष्ठ भूमिका बजावली आहे. केलेले आरोप हे केवळ राजकीय द्वंद्वातून प्रेरित आहेत. महिला सन्मान आणि सुरक्षेची भक्कम भूमिका आजवर राहिली आहे. भूमाता ब्रिगेडकडून वारंवार अशा प्रकारे निवडक लोकांवर आरोप केले जातात. माझ्यावरील आरोपही त्या पद्धतीचा एक भाग असल्याचे ते म्हणाले. सध्या या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, या प्रकरणात सत्य काय आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...