spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले 'मोठे'आवाहन

Maratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले ‘मोठे’आवाहन

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री-
Manoj Jarange Patil: आरक्षण मिळावे हीच गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे. आम्हाला गोळ्या घातल्या, हाणलं तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मुंबईत गेल्यावर आम्ही मागे हटणार नाही. सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. तसं केलं नाही तर आमच्या पोरांचं वाटोळं होणार आहे. मराठा समाजाने आंदोलनासाठी सज्ज व्हा आणि सावध राहा. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.

मुंबईतल्या आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडेलेले दिसतील. कुणीही घरी बसू नका. आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे चला असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि ती सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं असताना आम्हाला त्या युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? असा प्रश्नही मनोजजरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला जे आरक्षण दिलं जाईल असं सांगितले जात आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारलं नाही आम्हाला सगळं मान्य आहे. मात्र सरकारने सांगावं की ते टिकणार का? तसं होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा…

आमची भूमिका मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी आहे. आमच्या हक्काचं ते आरक्षण आहे आणि आम्हाला ते मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील वगैरे नेत्यांनी आमच्या बद्दल मागून बोलू नये. धरसोड मी नाही तर त्यांनी केली. त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांची बैठक घेतली का? हे त्यांना विचारा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार म्हणतं आहे की २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल. त्यामुळेच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. जर सरकार २० तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला काहीही हौस नाही मुंबईला जाण्याची असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...

मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे डोळे धोक्यात! नेत्रतज्ज्ञांच्या 6 सोप्या टिप्स वाचा एका क्लिकवर

नगर सहयाद्री वेब टीम आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये...