संगमनेर | नगर सह्याद्री
अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. यामध्ये ज्यांचे योगदान नाही. ते आता श्रेेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली होती. ही विकास कामांची स्थगिती हायकोर्टातून उठवली असून आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कुरण येथे संगमनेर कुरन-पारेगाव खु, नान्नज दुमाला या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी. निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मणराव कुटे, बी.आर.चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माईल, जावेद महम्मद हुसेन, प्रभाकर सोनवणे, शाहानवाज महमद हमीद, अजीज मोहिद्दन, मुदसर मन्सुर सय्यद, तार महम्मद अबास, खलील अबास, रियाज लतीफ आदिंसह कुरण गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या जाती व धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही. संपूर्ण राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळून कालव्याची कामे पूर्ण केली. उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे योगदान आहे अशांपैकी कोणीही नव्हते. श्रेेय घेण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहे. मात्र जनतेला खरे माहित आहे. याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण ७५० कोटींचा निधी मिळवला. तर रस्त्यांच्या कामासाठी ही मोठा मोठा निधी मिळवला.
मात्र विरोधी पक्षातील आमदारांच्या विकास कामांना या विद्यमान सरकारने स्थगिती दिली. आता ही स्थगिती हायकोर्टातून उठवली असून कामे पूर्वत सुरू केली आहे. कठीण काळ असला तरी तो जास्त नाही.आगामी काळात सरकार हे महाविकास आघाडीचेच आहे. मात्र जातीयतेतू होत असलेले ध्रुवीकरण हे संविधानाने लोकशाहीसाठी घातक असून सर्वांनी मतभेद विसरून तालुका, राज्य व देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख यांनी केले तर निसार शेख यांनी आभार मानले. हे रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने कुरण गावांमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.