श्रीगोंदा | नगर सह्याद्री
माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांचा ९० व्य जयंती सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार १९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कारखाना कार्यस्थळावरील हायस्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
शुक्रवार दिनांक १९ रोजी दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कारखाना कार्यस्थळावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. स्व बापूंच्या स्मृतीस्थळी जावून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी विद्यानिकेतन हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सभेस संबोधित करण्याकरिता उपस्थित होतील.
तरी सदर कार्यक्रमास सभासद, शेतकरी व ग्रामस्थ बंधु- भगीणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, युवक नेते दीपक नागवडे व संचालक मंडळ यांनी केले आहे.
बुधवार दि १७ रोजी सकाळी अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे कुकडी डाव्या कालव्याच्या चालू आवर्तनातून विसापूर धरणात पाणी सोडण्यासाठी निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली व त्यानुसार त्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.