Ahmednagar Crime News :प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात ना, हे वाक्य कधीकधी अगदी तंतोतंत खरं वाटतं. या वाक्याला साजेशी एक घटना नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली आहे. वकील असणाऱ्या पत्नीच्या कर्त्याने सध्या खळबळ उडाली आहे. वकील पत्नीसह तिच्या प्रियकराला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व हत्या झालेली व्यक्ती जालन्यातील रहिवासी आहेत. नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात झालेल्या हत्या प्रकरणाचा नेवासा पोलीस व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास लावण्यात यश मिळवले असून याप्रकरणी हत्या झालेल्या तरुणाच्या वकील पत्नीसह तिच्या प्रियकराला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व हत्या झालेली व्यक्ती जालन्यातील रहिवासी आहेत.
अधिक माहिती अशी की, १६ ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारात शिवाजीराव पवार मेडिकल कॉलेजच्या जवळील शेतात एका अनोळखी इसमाचा कोणीतरी धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याचे आढळून आले होते. घटनेबाबत पोलीस पाटील संजय लक्ष्मण वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षकांनी नेमलेल्या दोन्ही पथकांनी आजुबाजुच्या लोकांना मयताची माहिती देऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर मयताची ओळख पटली नव्हती. त्यामुळे सदर मयत हा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्र् मधील सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले होते. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आजुबाजूस रंनॉल्ट ट्रिबर गाडी संशयितरित्या फिरत असताना दिसली.
सदर गाडी अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाई नगर, जुना जालना) याचे नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गाडी मालकाचा शोध घेत असताना त्याचा फोन मागील १५ ते २० दिवसांपासून बंद असल्याने त्याची ता. इंदापूर, जि. पुणे येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. गुरुवार २९ ऑगस्ट रोजी लोणी (ता. इंदापूर जि. पुणे) येथे जाऊन मिना म्हस्के हिचा शोध घेत असताना ती लहु शिवाजी डमरे (वय ३१) (रा. ढोकसळ, ता. बदनापूर जि. जालना) या इसमासह मिळून आली नंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.मयत पती अंबादास भानुदास म्हस्के हा नेहमी तिला चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरिता जायचे आहे असे सांगून त्यास रेनॉल्ट ट्रिबर गाडीमध्ये घेऊन येऊन रात्रीच्यावेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.