spot_img
अहमदनगरभर जत्रेत 'भयंकर' प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं...

भर जत्रेत ‘भयंकर’ प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं घडलं काय?

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री-
भर जत्रेत भयंकर प्रताप घडला आहे. लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये टोळक्याने केलेल्या कृत्याने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावं हादरलं आहे. जुन्या वादावरून सात आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून एका युवकाची हत्या केली.

अक्षय आपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय दाबीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या वादावरून लक्ष्मी देवी मंदिराजवळ संशयित सात ते आठ जणांनी चाकू, सत्तुर, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी अक्षय संजय आपशेटे याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्यास भावाने व इतरांनी तातडीने खासगी रुग्णालय व तेथून शेवगाव येथे उपचारासाठी हलवले. परंतु प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्यानंतर अक्षय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...