spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: पिकअप चोरणार्‍या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या! 'असा' लावला सापळा

Ahmednagar Crime: पिकअप चोरणार्‍या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
घरासमोर उभा केलेला पिकअप चोरून नेणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीची पिकअप व दुचाकी असा दोन लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संदीप आप्पासाहेब बर्फे व राहुल नवनाथ बर्डे (दोघे रा. आडगाव ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

खोसपुरी (ता. नगर) येथील रज्जाक सिकंदर शेख यांची पिकअप (एमएच १६ एई २४१४) त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करत असताना त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती काढली असता तो पिकअप जोडमोहज (ता. पाथर्डी) येथे असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या पथकाने पिकअप व त्याची चोरी करणार्‍या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पिकअप चोरीसह आडगाव येथून दुचाकी (एमएच १६ सीएल ७४०५) चोरी गेल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी पिकअप, दुचाकी हस्तगत करून दोघांना अटक केली.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, किशोर जाधव, सुनील आव्हाड, विष्णु भागवत, भगवान वंजारी, केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...