spot_img
ब्रेकिंगAhmednagar News: जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के! पुणे विभागात नगरचा तिसरा क्रमांक

Ahmednagar News: जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के! पुणे विभागात नगरचा तिसरा क्रमांक

spot_img

अहमदनगरमध्येही मुलीच हुशार | पुणे विभागात नगरचा तिसरा क्रमांक
अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला आहे. अहमदनगरमध्येही मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा निकालातून स्पष्ट झाले आहे.

बारावीची परीक्षा फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आली होती. परिक्षेसाठी ६४ हजार ९७ विद्यार्थी बसले होते. जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला असल्याचे शिक्षण विभागातून सांगिण्यात आले. मुलींचा निकाल ९६.४८ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९१.०८ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात पुणे विभागात नगर तिसर्‍या क्रमांकावर आहे.

तालुकानिहाय निकाल
* अकोले ः ९०.५९ * जामखेड ः ९५.४७ * कर्जत ः ९४.६० * कोपरगाव ः ९२.१३ * नगर ः ९४.४१ * नेवासा ः ९४.६६ * पारनेर ः ९३.८३ * पाथर्डी ः ९२.७६ * राहाता ः ९३.८७ * राहुरी ः ९२.०३ * संगमनेर ः ९५.२२ * शेवगाव ः ९५.६२ * श्रीगोंदा ः ९३.१७ * श्रीरामपूर ः ८५.८०

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...