spot_img
अहमदनगरद्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार, हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पारगाव मध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. तसेच तालुक्यातील इतर गावामध्ये नविन द्राक्षाची लागवड केलेली दिसत आहे. तालुक्यामध्ये द्राक्षाची एकूण १३६२.९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे यांनी ‘नगर सह्याद्री’ शी बोलताना दिली.

निसर्गाच्या अवकृपेवर शेतकऱ्यांनी मात करत यंदाच्या द्राक्ष हंगामाला गती आली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत २५ टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची बाजारपेठेत विक्री झाली आहे. द्राक्षाचे दर टिकून आहेत. हंगामाच्या प्रारंभीपासून यंदा द्राक्षाची गोडी वाढली आहे. येत्या काळात द्राक्षाचे दर वाढण्याचीही शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील द्राक्ष विक्री डिसेंबर मध्यापासून सुरू झाली. हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. गेल्या आठवड्यापासून द्राक्ष हंगामास गती आली आहे.

बाहेर गावातील मजूर द्राक्ष काढण्यासाठी आलेले दिसत असून परगावातील व्यापारी द्राक्षपट्ट्यात दाखल झाले आहेत. बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने द्राक्षाचे दर चांगले आहेत. जानेवारी महिन्यात ६० रुपयांपासून ते ११० रुपये प्रति किलो असा दर होता. मधल्या काळात द्राक्षाच्या दरात प्रति किलोस १० रुपयांनी दर घटले होते. परंतु द्राक्षाच्या दरातील घट फार काळ राहिली नाही. त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली. सध्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने पीक चांगले आहे. द्राक्षात गोडी उतरली आहे. रंग, आकार चांगला आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. द्राक्षाचे उत्पादन घटल्याने मागणी अधिक आहे, पण त्यादृष्टीने पुरवठा होत नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्षाचे दर वाढण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एकरी १० टनांपर्यंत उत्पादन
द्राक्षाचे सरासरी उत्पादन १० ते १४ टनापर्यंत शेतकरी घेतात. मात्र, यंदा द्राक्ष पिकाच्या फळ छाटणीपासून विविध वाढीच्या टप्प्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने बागेचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीच्या काळात ४० टक्के उत्पादन घटणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, द्राक्ष काढणी सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ होऊन ती सध्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अर्थात सध्या एकरी चार टनांपासून ते १० टनांपर्यंत उत्पादन हाती येत आहे, असे द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांनी बोलतांना सांगितले.

उत्पादन खर्चात बेसुमार वाढ
द्राक्ष उत्पादनासाठी लागणाऱ्या औषधांच्या वाढलेल्या किंमती, खतामध्ये होत असलेली वाढ, निसर्गाची अवकृपा, अवेळी होणारा पाऊस व त्यामुळे उद्भवणारे विविध रोग, मजुरीची वाढलेले दर, डिझेल, पेट्रोलमधील दरवाढीमुळे वाढणारा वाहतूक खर्च यामुळे, द्राक्ष उत्पादकाच्या उत्पादन खर्चात बेसुमार वाढ झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...