spot_img
अहमदनगरनगरचा 'तो' वाळूतस्कर स्थानबद्ध ! 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

नगरचा ‘तो’ वाळूतस्कर स्थानबद्ध ! ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाळूतस्करांच्या विरोधात आता थेट एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करणारा वाळूतस्कर आशीफ शमशुद्दीन तांडेल (वय ३० रा. तांडेलगल्ली, पेडगाव) याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करण्यात अली असून त्याची रवानगी नाशिकच्या कारागृहात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आदेश दिले आहेत.

सराईत गुन्हेगार तांडेल यांच्यावर गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून मारहाण करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी दुखापत करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, शासकीय वाळू चोरी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या समाजविघातक कृत्याला आळा घालण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून पोलीस उपअधीक्षक, कर्जत विभाग व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठविला होता.

सदर प्रस्तावाची अधीक्षक ओला यांनी बारकाईने पडताळणी करून सदरचा प्रस्ताव हा शिफारसअहवालासह जिल्हाधिकारीसालीमठ यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता तांडेल विरोधात स्थानबध्द करणेबाबत आदेश काढले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...