अहमदनगरमध्येही मुलीच हुशार | पुणे विभागात नगरचा तिसरा क्रमांक
अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला आहे. अहमदनगरमध्येही मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा निकालातून स्पष्ट झाले आहे.
बारावीची परीक्षा फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आली होती. परिक्षेसाठी ६४ हजार ९७ विद्यार्थी बसले होते. जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला असल्याचे शिक्षण विभागातून सांगिण्यात आले. मुलींचा निकाल ९६.४८ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९१.०८ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात पुणे विभागात नगर तिसर्या क्रमांकावर आहे.
तालुकानिहाय निकाल
* अकोले ः ९०.५९ * जामखेड ः ९५.४७ * कर्जत ः ९४.६० * कोपरगाव ः ९२.१३ * नगर ः ९४.४१ * नेवासा ः ९४.६६ * पारनेर ः ९३.८३ * पाथर्डी ः ९२.७६ * राहाता ः ९३.८७ * राहुरी ः ९२.०३ * संगमनेर ः ९५.२२ * शेवगाव ः ९५.६२ * श्रीगोंदा ः ९३.१७ * श्रीरामपूर ः ८५.८०