spot_img
ब्रेकिंगराजकीय वातावरण तापलं! निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का? माजी मंत्री राजीनामा देणार..

राजकीय वातावरण तापलं! निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का? माजी मंत्री राजीनामा देणार..

spot_img

 

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बागुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याचे म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी गुरुवारी मुंबईत भेट घेतली. नुकतेच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच, आता लक्ष्मण ढोबळे यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो, आता ते भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देऊ लागले. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता पुन्हा मी भाजप सोडत आहे, असे म्हणत लक्ष्मण ढोबळे यांनी तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केली आहे. अजित पवारांना वाटतं की, पैशांचा जिवावर राजकारण करता येतं, मात्र तसं होत नाही. तुमच्या काकांनी कसं राजकारण केलं ते पाहा, असा सल्लाही ढोबळे यांनी अजित पवारांना दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...