श्रीगोंदा। नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील बाप-लेकाच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.नशेडी पुत्रानं बापासह भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घडाळ्या हिरामण चव्हाण (वय ५०) व महावीर घडाळ्या चव्हाण (वय २७) अशी मयतांची नावे आहेत. नशेडी पुत्र जावेद घडाळ्या चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील तालुक्यातील सुरेगाव येथे चव्हाण कटूंब वास्तव्यास होते.अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आली होती. त्यांच्या घरातील वादामुळे जावेद याची पत्नी नांदत नव्हती त्यामुळे गुरूवारी रात्री जावेद हा दारू पिऊन पत्नीला आणण्यासाठी पिता घडाळ्या यांच्याकडे पैशाची मागणी करत होता.
मात्र त्यांनी पैसे देणार नसल्याचे सांगताच त्यांच्यात वाद झाला. किरकोळ वाद टोकाला गेला भांडणे सोडवण्यासाठी भाऊ महावीर मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर जावेदने धारदार शस्राने महावीर वर केले. ते पाहून मुलाला वाचविण्यासाठी घडाळ्या हे गेले असता त्यांच्यावर ही धारदार शस्राने वार करत बापासह भावाची हत्या केली.