spot_img
अहमदनगरसावधान! 'तो' पुन्हा दिसला? थोडक्यात चिमुकली बचावली तर युवक बेशुद्ध पडला

सावधान! ‘तो’ पुन्हा दिसला? थोडक्यात चिमुकली बचावली तर युवक बेशुद्ध पडला

spot_img

राहाता। नगर सहयाद्री

एकीकडे रांजणखोल परिसरातील ढोकचौळे यांच्या वस्तीवर बिबट्याने दहशत निर्माण केली असून लहान मुले संध्याकाळच्या सुमारास खेळत असताना अचानक बिबट्या मुलांसमोर आल्याने मुले घाबरून गेली होती. तर दुसरीकडे लोणी मधील गावालगत असणाऱ्या बळीनारायण रस्त्यावरील मेहेत्रे यांच्या घराच्या गेटमध्ये बिबट्याला बघून त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा अथर्व बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे.

थोडक्यात चिमुकली बचावली
संध्याकाळच्या वेळेस मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याला कोंबडी दिसली कोंबडीचा पाठलाग करताना बिबट्या अचानक खेळत असलेल्या लहान मुलांसमोर आला. बिबट्याला पाहून मुलं घाबरली मुले जोरात ओरडली त्यात एका मुलाने बिबट्याला पतंगदोराची आसरी फेकुन मारली व बिबट्या माघारी फिरत त्याने कोंबडीला पकडून पुन्हा मक्याच्या शेतात धूम ठोकली. बेळीच मुलांनी प्रसंगावधान दाखबले म्हणून मोठा अनर्थ टळला.

बिबट्याला बघून युवक बेशुद्ध
शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणी बुद्रुक गावालगत बळीनारायन रस्त्यावरील सोमनाथ मेहेत्रे यांचा अठरा वर्षांचा मुलगा अथर्व घराच्या दारात उभा असताना बिबट्या समोर येऊन उभा राहिला. गेट बंद असल्याने तो वाचला मात्र बिबट्याला बघून तो जोरात ओरडला आणि तिथेच बेशुद्ध पडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...