spot_img
देशपुढील पाच दिवस पावसाचे ! कुठे कुठे बरसणार, पहा..

पुढील पाच दिवस पावसाचे ! कुठे कुठे बरसणार, पहा..

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : देशातील अनेक राज्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल hotan dist असून आता उन्हाळ्यात पावसाळा अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. एकीकडे कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे हवामान खात्याने देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील वातावरणात झालेल्या बदलामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज 27 मार्च रोजी नवी दिल्लीत किमान तापमान 19 अंश होते. कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत नोंदले गेले आहे. यामुळे आज नवी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च आणि २९ मार्चरोजीही पावसाची शक्यता आहे. 30 मार्चला नवी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

२७ मार्चला या भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २७ मार्चला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील सुदूर या भागात पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.

२८ मार्चला या भागात पावसाचा अंदाज
२८ मार्चला हिमाचल प्रदेशला गारपीटीची शक्यता आहे. पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हरियाणा आणि चंडीगडच्या सुदूरमध्ये विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.

२९ व ३० मार्चला या भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागानुसार, २९ मार्चला हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थानमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ३० मार्चला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...