spot_img
महाराष्ट्रलोकसभेच्या तोंडावर मनोज जरांगे यांचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा ! म्हणाले, आता राजकारणात..

लोकसभेच्या तोंडावर मनोज जरांगे यांचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा ! म्हणाले, आता राजकारणात..

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता राजकीय दृष्ट्या मोठा इशारा दिला आहे. सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, राजकारणात मला हलक्यात घेऊ नका. मला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे.

या आंदोलनात माझा काही स्वार्थ नाही. त्यामुळे मी सरकारला विनंती करून सांगतो, समाजाच्या मागण्या मान्य करा. मला या आंदोलनातून काही व्हायचं नाही आणि मी होणारही नाही. मी समाजाला शब्द दिला आहे आणि मी शब्द दिला म्हणजे दिला.. येत्या ३० मार्चपर्यंत योग्य निर्णय घ्या. मराठ्यांची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही उमेदवार निवडणार नाही, तसेच कोणाला पाठिंबादेखील देणार नाही. ३० तारखेपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा त्यानंतर आम्ही कोणालाही जुमानणार नाही. आम्ही आमच्यात जे निर्णय घेतलेत, जे काही ठरलंय, त्यानुसार धडाधड कामं सुरू करणार, निर्णय घेणार. कारण आम्ही आमचं ठरवलंय. मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं होतं, की आंदोलनावेळी तुम्ही मला हलक्यात घेतलं होतं. परंतु, आंदोलनावेळी तुम्ही मला हलक्यात घेतलंत तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची बैठक झाली त्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे करण्याबाबत मराठा आंदोलक विचार करत होते. परंतु, मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केल्यास मराठा मतं फुटतील. त्यामुळे एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा असं जरांगे यांनी बैठकीत सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...