spot_img
अहमदनगरAhmednagar News : थकबाकीदारांसाठी महापालिकेने दिली गुड न्युज

Ahmednagar News : थकबाकीदारांसाठी महापालिकेने दिली गुड न्युज

spot_img

शास्तीत सवलत / महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची घोषणा ः ९ डिसेंबरपर्यंत मुदत
Ahmednagar News : अहमदनगर | नगर सह्याद्री – मार्चअखेर जवळ आला की मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीमध्ये सवलत देण्याची परंपरा यावर्षीही पाळण्यात आली. मात्र यावेळी मालमत्ता करासंदर्भातील लोक अदालतमध्ये असलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी ही सवलत दिली आहे. मात्र ही सवलत सरसकट नसून ज्यांची थकबाकी ५० हजारांपर्यंत आहे, अशाच थकबाकीदारांसाठी असल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले आहे. या सवलतीचा किती थकबाकीदार फायदा घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महापालिकेचा मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकित आहे. मालमत्ता कराच्या थकबाकीवर जुलैनंतर दरमहा दोन टक्के शास्ती आकारण्यात येते. म्हणजे वर्षभरात जमा न केल्यास जवळपास १८ टक्के शास्ती आकारली जाते. शास्तीमध्ये सवलत देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. महापालिकेचा वसुली विभाग वर्षभर वसुलीकडे दुर्लक्ष करतो. ऑक्टोबरनंतर महापालिका अधिकारी जागे होतात आणि वसुलीचे उद्दीष्ट ठरवून कारवायांचे इशारे देतात. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई त्यानंतरच सुरू होते. उद्दीष्टपूर्ती न केलेल्या कर्मचार्‍यांनाही इशारे देण्यात येतात. मात्र त्यांच्यावर कारवाई झाल्याचे आजपर्ंयत ऐकिवात नाही.

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी गुरूवारी शास्तीच्या रकमेवर ७५ टक्के सवलत देण्यात आल्याची घोषणा केली. व्यावसायिक व इतर सर्व मालमत्ता धारकांचे दि. ९ डिसेंबरपर्यंत लोकअदालती करिता मालमत्ता विषयक प्रकरणे ठेवण्याचे नियोजन मनपाने केले आहे. तसेच मनपाच्या पदाधिकार्‍यांनी दिलेली निवेदने विचारात घेऊन ही सवलत जाहीर करण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

शहरातील गरीब, कमी उत्पन्न गटातील मालमत्ता धारकांकरिता शास्तीमध्ये ७५ टक्के माफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्याची थकबाकी ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशांसाठीच ही सवलत असल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. यामध्ये विशेशतः झोपडपट्टी किंवा अत्यंत कमी उत्पन्न असलेल्यांचाच समावेश होऊ शकतो. अशा मालमत्ता धारकांनी ९ डिसेंबरपर्यंत या शास्ती माफीचा लाभ घेऊन कर मुदतीत जमा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...