spot_img
ब्रेकिंगMilk business : दूध व्यवसाय कोलमडला! ; आम्ही जगायच कसं? दूध व्यवसायिकांची...

Milk business : दूध व्यवसाय कोलमडला! ; आम्ही जगायच कसं? दूध व्यवसायिकांची कैफियत

spot_img

दुष्काळ अन दुधाला भाव नसल्याने दूध धंदा मोडकळीस
Milk business : सुनील चोभे / नगर सह्याद्री – दुष्काळजन्य परिस्थिती, चारा, पशुखाद्याचे भाव गगणाला भिडलेले अशा परिस्थितीत दुधाचे [Milk business] भाव गेल्या सहा महिन्यात तब्बल नऊ ते दहा रुपये पडले आहेत. दूध धंद्यात नफा तोट्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. तरीही दूध व्यावयायिक कसाबसा तग धरुन आहे. परंतु, चोहोबाजूने दूध व्यावयायिक अडचणीत सापडमुळे आता मात्र दूध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. पदरमोड करुनही व्यवयास टिकवणे मुश्किल झाल्याची कैफियत दूध व्यावसायिक मांडत आहेत.

[Ahmednagar News] आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर कोसळल्याने दुधाचे भाव कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता दूध दरात घसरण झाली आहे. चारा, खुराकाचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत पशुधन वाचवायचे आव्हान शेतकर्‍यांसमोर आहे. म्हशीच्या दुधाचा दर ५६ वरुन ४६ रुपये तर गायीच्या दुधाचा भाव ३६ वरुन २६ रुपये झाला आहे.

दुधाला शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळावा, पशुखाद्याच्या किमती ५० टक्के कमी कराव्यात, पशु औषधे जीएसटीतून मुक्त करावे, टोन्ड दुधावर बंदी आणावी, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत चारा डेपो व चारा छावणी सुरु करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. या निवेदनावर राहुल बहिरट, महेश कोठुळे, सुनिल कोठुळे, सागर कोठुळे, साई आढाव, दत्ता घोडके, ऋषीकेश निकम यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

चारा, पशुखाद्याच्या किमती वाढल्या
यंदा कमी पाऊस झाल्यामुळे चाराही कमी प्रमाणात उपलब्ध झाला. त्यामुळे ओला चारा ऊस, मका चार ते पाच रुपये किलो मिळत आहे. वाळलेला चारा ८ रुपये किलो मिळतो. तसेच सरकी पेंड, वालीस, गोळी पेंड यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. ५० किलो वालीस १४५०, गोळी पेंड १७५० (५० किलो) तर ७० किलो सरकी पेंडसाठी २५०० रुपये मोजावे लागत आहेत.

शेतकर्‍यांनी जगायच कसं?
शेती व्यवसायाला पुरक धंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतो. परंतु, यंदा कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप वाया गेला. तसेच रब्बीवर दुष्काळी संकट आहे. पिण्याला पाणी, जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती आहे. चारा, खुराकाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात दुधाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे दूध व्यावसायिकांना जगावे की मरावे हेच समजेनासे झाले आहे.
– नंदू रोकडे, शेतकरी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...