spot_img
ब्रेकिंगरील पेक्षा 'रियल' मध्ये विकास करणारा खासदार दिल्लीत पाठवायचा! आमदार जगताप यांचा...

रील पेक्षा ‘रियल’ मध्ये विकास करणारा खासदार दिल्लीत पाठवायचा! आमदार जगताप यांचा विरोधकांना टोला

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रील पेक्षा रियल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉ.सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन केले. तर काही लोक केवळ रील मध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपची युती असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठया मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी सांगत सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच सुजय विखे आणि आपण नगर जिल्ह्याच्या विकासाचा रोड मॅप तयार केला असून लवकरच तो लोकांसमोर आणू असेही ते यावेळी म्हणाले. सदरची निवडणूक देशासाठी असून देशाबरोबर नगरचा निकाल सुद्धा विक्रमी असेल असे त्यांनी आश्वासन दिले.

तर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. पण आज युतीच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी जे सहकार्य दाखवले ते मोठ्या कौतुकाचे असून त्यांचे आभार व्यक्त केले. येणाऱ्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा कायापालट करू, महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम, गरिबांना स्वस्त दरात घरे, वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आम्ही चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नावारुपास आणू असे आश्वासन विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले.

यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, राष्ट्रवादी नगर जिल्हाध्यक्ष संपत बावस्कर, माजी जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्रणिक संघवी, राजेश बोथरा संचालक कृषी बाजार समिती, संजय चोपडा संचालक मर्चंड बँक, नगरसेवक निखिल जिव्हारे आणि इतर राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...