spot_img
अहमदनगरझोपड्यांमध्ये लावलेला दिवा भावी पिढीला दिशा देणारा ठरेल ; रसिक ग्रुपच्या वतीने...

झोपड्यांमध्ये लावलेला दिवा भावी पिढीला दिशा देणारा ठरेल ; रसिक ग्रुपच्या वतीने झोपड्यांमध्ये दीपोत्सव साजरा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील प्रेमदान हडको जवळील गरीब, वंचीत कुटुंबातील झोपड्यांमध्ये जाऊन पणती पेटवून प्रकाशित केली, आणि झोपडीच्या दाराला स्वतःच्या हाताने तोरण बांधून गरीब कुटूंबासोबत उपस्थित मान्यवर व रसिक ग्रुप सोबत एकत्र येतं दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. पणतीच्या प्रकाशाप्रमाणे प्रत्येक कुटुंबात सुख शांती तेवत राहावी. गरीब कुटुंबातील झोपड्यांमध्ये लावलेला दिवा हा केवळ दिवाळीसाठी लावला नाही तर या कुटुंबातील भावी पिढीला भविष्यात उज्वल दिशा देण्यासाठी लावण्यात आला आहे. ज्या नागरीकांचे हातावर पोट आहे अशांची दिवसभर कष्ट करून आपली दिनचर्या सुरु राहते त्यांना देखील दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी रसिक ग्रुपने सामाजिक भावनेतून राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

रसिक ग्रुपच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रेमदान हडको येथील गरीब कुटुंबातील झोपड्यांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी रसिक ग्रुप अध्यक्ष जयंत येलूलकर, उद्योजक के के शेट्टी, प्रदीप पंजाबी, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, नंदकुमार आढाव, चंद्रकांत पालवे, दशरथ खोसे, ऋषिकेश येलूलकर, दीपाली देऊतकर, स्नेहल उपाध्ये, तेजा पाठक, डॉ. ज्योती चोपडे, बाळकृष्ण गोटीपामुल, कर्डिले डेकोरेटर्स चे संजय कर्डिले, विठठल शिंदे, अशोक जोशी, महावीर गुगळे, प्रसन्न एखे, निखिल डफळ, विनायक मुत्याल, शामा मंडलिक, स्वाती अहिरे, सुनिल महाजन, गणेश गोंडाळ, सरोज आल्हाट यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रसिक ग्रुप अध्यक्ष जयंत येलूलकर म्हणाले की, सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन रसिक ग्रुपच्या माध्यमातून गरीब कुटुंबाची दिवाळी गोड व आनंदात साजरी व्हावी यासाठी साडी, दिवाळी फराळ, फटाके, मिठाई, पणती, तोरण आदी वस्तू भेट देण्यात आल्या आहे. तसेच शहरातील अशाच गरीब कुटुंबापर्यंत पोहचून त्यांना देखील दिवाळी निमित्त रसिक ग्रुपच्या वतीने भेट वस्तू देण्यात येणार आहे. या कुटुंबांच्या चेहर्‍यावरील आनंद हीच खरी सुखाची भावना असते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीनिवास बोज्जा यांच्या वतीने बाळगोपाळांना फटाके देण्यात आले. या गरीब कुटुंबातील सदस्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्याचे समाधान ही मानवतेची पुजा असते. असेही येलुलकर म्हणाले तेजा पाठक यांनी स्वागत केले तर दीपाली देऊतकर यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...