spot_img
अहमदनगरपत्नीच्या चारित्र्यावर संशय! पतीने शेवटी काटा काढला..; पारनेर तालुक्यातील घटना

पत्नीच्या चारित्र्यावर संशय! पतीने शेवटी काटा काढला..; पारनेर तालुक्यातील घटना

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
६५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत खून केल्याची घटना घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी (दि.३ ऑक्टोबर) सकाळी घडली. ताराबाई राजाराम थोरात (वय ६५, रा. बोरवाक मळा, ढवळपुरी, ता.पारनेर) असे मयत महिलेचे नाव असून राजाराम रेवजी थोरात (वय ७०) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीचा खुन केल्यानंतर पतीनेही गळफास घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला.

ढवळपुरी शिवारातील वनकुटे स्त्यावरील बोरवाक मळा परिसरात थोरात कटूंब वास्तव्यास आहे. गुरूवारी सकाळी राजाराम व त्याची पत्नी ताराबाई यांच्यात वाद झाले. राजाराम याचा डोक्यात संशयाचे भूत फिरत होते. त्याच रागातून राजाराम याने पत्नी ताराबाई हीस चटके दिले. त्यानंतर शेजारच्या कपाशीच्या शेतामध्ये नेऊन कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार केले. त्यात पत्नी ताराबाई हिचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी राजारामचा मुलगा संजय हा शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता तर सुन आशा जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या.

त्या घरी आल्या असता घरामध्ये भाकरी अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सासरा राजाराम याच्याकडे आत्या कुठे गेल्या याची विचारणा केली असता राजाराम याने हाताने विहीरीकडे बोट दाखविले. सासू- सासऱ्यांमध्ये भांडण होऊन सासऱ्याने सासूला विहीरीत ढकलून दिल्याचा संशय सुन आशा यांना आला. त्यांनी विहीर परीसरात पाहणी केली असता त्यांना तिथे काही आढळून आले नाही.

सुन आशा या सासू न सापडल्याने परत घरी आल्या. त्यावेळी घरामध्ये राजाराम याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. आशा आल्या त्यावेळी दोरी तुटल्याने गळयाला दोरी बांधलेल्या अवस्थेत राजाराम जमीनीवर पडलेला होता. आशा यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून राजाराम यास रूग्णालयात दाखल केले. सायंकाळी राजाराम शुध्दीवर आला. राजाराम यास रुग्णालयात दाखल केल्यानंतर आशा व त्यांच्या मुलाने सासूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना घराजवळच्या कपाशीच्या शेतामध्ये ताराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाजवळ गुन्हयात वापरण्यात आलेली कुऱ्हाडही आढळून आली.घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...