spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यातील 'या मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा! उमेदवारीसाठी कुणी- कुणी दिल्या मुलाखती?...

नगर जिल्ह्यातील ‘या मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा! उमेदवारीसाठी कुणी- कुणी दिल्या मुलाखती? वाचा एका क्लिकवर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत .विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघवर काँग्रेसने जोरदार दावा केला आहे. मतदारसंघा मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांची नेमणूक केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

यावेळी कर्जत-जामखेड मधून ॲड. शेवाळे, श्रीगोंद्यातून घन:श्याम शेलार, पाथर्डी – शेवगाव मधून नासिर शेख, समीर काझी, नगर मधून किरण काळे, मंगल भुजबळ, मोसिम शेख, शिर्डी विधानसभा मतदारसंघात डॉ. एकनाथ गोंदकर, अॅड. पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आ. लहू कानडे, हेमंत ओगले, चेतना बनकर, विजय खाजेकर, प्रकाश संसारे, विक्षनाथ निर्वाण, युवराज बागुल, नेवासा विधानसभा मतदारसंघात संभाजी माळवदे, सुरेश शेटे, अकोले विधानसभा मतदारसंघातून सतीश भांगरे वा इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी पक्ष निरीक्षकांना काँग्रेसचे तिकीट मिळण्यासाठी मुलाखती दिल्या.

जिल्हाध्यक्ष किरण काळेंना उमेदवारी द्या
नगर शहरामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे. शहरातील सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे विरोध करण्याची आणि विकासाचे व्हिजन घेऊन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद ही शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. दक्षिणेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तर उत्तरेत शिवसेना उबाठा गटाचा खासदार केला. आता मात्र शहराच्या आमदारकीच्या बाबतीत तडजोड नको. कोणत्या ही परिस्थितीत शहराची जागा काँग्रेसकडेच घ्या आणि किरण काळेंना उमेदवारी द्या, अशी जोरदार मागणी शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्याकडे केली आहे.

ससाणे-कानडे गटाची गटबाजी चव्हाट्यावर
शिर्डी येथे सकाळी शिर्डी, अकोले, नेवासा, श्रीरामपूर, या विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. पक्ष निरीक्षक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेत असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत बैठकीत गोंधळ घातला. ‘एकच वादा करण दादा’ अशा घोषणा एका गटाने दिल्या तर ‘कानडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत दुसऱ्या गटाने बैठकीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...