spot_img
ब्रेकिंगगुडीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! शरद पवार गटाला मिळाल्या 'इतक्या'...

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! शरद पवार गटाला मिळाल्या ‘इतक्या’ जागा?

spot_img

मुंबई- नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषदेत ठरला असून एकत्रितपणे घोषणा करण्यात आली.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट २१ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष १७ लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा करणार आहे.

काँग्रेस- नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

(राष्ट्रवादी) शरद पवार गट– बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

(शिवेसना) ठाकरे गट– जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...