spot_img
अहमदनगरगोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? 'यांनी' साधला 'लंके' यांच्यावर निशाणा

गोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? ‘यांनी’ साधला ‘लंके’ यांच्यावर निशाणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच अहमदनगर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेत केलेल्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रतीउत्तर देत निशाणा साधला आहे.

जिल्हाध्यक्ष भालसिंग म्हणाले, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला.

सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेल्या कार्यामुळे कुणाच्या बुडाला मिरची लागण्याचे कोणतेही कारण नाही. पाच वर्षे ‘आपला माणूस’ म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे. गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे.

त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही. पारनेरच्या आमदारांनी लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला द्यावी. गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्याना विकास काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...