spot_img
अहमदनगरAhmednagar politics:..यांच्यामुळे बोल्हेगावचा विकास! आमदार जगताप यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

Ahmednagar politics:..यांच्यामुळे बोल्हेगावचा विकास! आमदार जगताप यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
बोल्हेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी पाठपुराव्याची गरज असते. कुमारसिंह वाकळे यांची पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सावेडी बोल्हेगाव रस्ता रुंदीकरणासाठी तसेच सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. लवकरच हे कामही मार्गी लागणार आहे. या भागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, साधना बोरूडे, रजनी अमोदकर, योगिता थोरात, पुनम मरकड, दिपाली वाघ, प्रणिता शिंदे, गौरी निकम, अनिता पगारे, मोहीनी भोसले, रूपाली सोनवणे, अंजली खेंडके, दास गायकवाड, संतोष गेरंगे, धनंजय वाघ आदी उपस्थित होते.

नगरसेवक वाकळे म्हणाले की, बोल्हेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत चांगले काम करत असतात. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांची प्रेरणा मिळाली आहे. पोलीस कॉलनी परिसरातील नागरिक विविध प्रश्नांना सामोरे जात होते. मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला दिली व मी गेल्या दहा वर्षांमध्ये या भागाचा विकास कामांतून कायापालट केला आहे.

राजेंद्र लांडगे म्हणाले की, पोलीस कॉलनी परिसरात मध्ये लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज आधी स्वरूपाचे प्रश्न गंभीर होते. कुमारसिंह वाकळे यांनी या भागाचे विकास कामातून नंदनवन केले आहे. विकास कामातून या परिसराला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले असल्यामुळे आता आम्हाला शहरांमध्ये राहिल्यासारखे वाटत आहे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांना विकास कामाच्या माध्यमातून वाढदिवसाची भेट दिली आहे. आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रेम मिळवले आहे असे ते म्हणाले.

विकास कामांचे स्वागत सण, उत्सवाप्रमाणे
बोल्हेगाव परिसरामध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लागत असताना या कामांचा लोकार्पण सोहळा एखाद्या सण उत्सवाप्रमाणे होत असतो. वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजे. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेला रस्ता काँक्रिटीकरण्याच्या माध्यमातून भेट दिली आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

विरोधकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले
आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची सर्व कामे पूर्ण करत आहोत. मात्र विरोधकांकडे कुठलेही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करतात. जे नगरसेवक होऊ शकत नाही. त्यांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत. पण त्यांना पहिल्यांदा आमच्याशी सामना करावा लागेल. जनतेनेही विकास कामे करण्यासाठी पाठीमागे उभे राहावं, भूलथापांना बळी पडू नका, जनतेचा विकास जनतेच्या हातात आहे. जो विकासाची कामे करेल त्याच्या पाठीमागे उभे राहावे असे मत नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...