संगमनेर। नगर सहयाद्री-
नगर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका शिवारात मृतदेह आढळला आहे. मृतदेहच्या डोक्याला मोठी जखम असूनघात की अपघात? याबाबत अस्पष्टषज्ञ आहे, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
संगमनेर महामार्गालगत साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिरासमोर ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. सकाळी काही नागरिकांनी मंदिराजवळ जाऊन बघितले असता एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
सदर घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, मृतदेहाजवळच दगड, चप्पल, आधारकार्डासह इतर कागदपत्रे आढळून आली.
त्यानुसार देवराम मुक्ता खेमनर (वय ६५ रा. चिचेवाडी) असे व्यक्तीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील एका रुग्णालयात पाठविण्यात आला असून घडलेल्या घटनेचा पोलीस सखोल तपास करत आहेत.