spot_img
अहमदनगरगुन्ह्याचा छडा लागला! जीपचालकाने २८ वर्षांच्या तरुणाला संपवल..; पुन्हा जिल्ह्यात काय घडलं..

गुन्ह्याचा छडा लागला! जीपचालकाने २८ वर्षांच्या तरुणाला संपवल..; पुन्हा जिल्ह्यात काय घडलं..

spot_img

Ahmednagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान चांगली ओळख झाल्याने दोघेही नेवासे परिसरात दोन वेळा दारू प्यायले. मात्र, श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात वाद होऊन प्रकरण थेट खुनापर्यंत गेले. पोलिसांनी प्रथमदर्शनी कोणत्याही पुराव्याशिवाय गुन्ह्याचा छडा लावत जीप चालकाला जेरबंद केले आहे.

श्रीरामपूर राहाता तालुक्याच्या हद्दीवर नांदूर परिसरामध्ये ४ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पोलिसांना एक मृतदेह सापडला होता. मृतदेहावर काही जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांना खिशातील मोबाइलवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले होते. त्यावरून मयत व्यक्ती हा नितेश आदिनाथ मैलारे (वय २८, रा. पोखंडेवाडी, ता. मुखेड, जि.नांदेड) असल्याचे समजले.

पोलिसांनी याप्रकरणी केलवड (ता. राहाता) येथील ऋषिकेश देवण्णा बरबट (वय २५) या जीप चालकाला अटक केली आहे. मयत नितेश मैलारे हा छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीला जाण्यासाठी आलेला होता. तेथे तो वाहनांची वाट पाहत उभा होता. त्याच वेळी बरबट हा त्याच्या जीपमधून चालला होता. त्याने मैलारे याला आपल्या जीपमध्ये बसवले. दोघांमध्ये प्रवासामध्ये चांगली ओळख झाली.

नेवासे परिसरामध्ये रस्त्यात गाडी थांबवून ते दोन वेळा दारू पिले. त्याच्यात मैत्रीचे संभाषण सुरू सुरू झाले. श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात खटके उडाले. वादावादी सुरू झाली. गाडीतच त्यांच्यात भांडण झाले. श्रीरामपूर शहर ओलांडताच जीप चालक बरबट याने वाहनातील टॉमीने मैलारे याच्यावर वार केला. यात मैलारे हा गंभीर जखमी झाला. बरबट याने त्याला रिक्षातून ढकलून दिले. त्यानंतर तो केलवड येथे घरी पोहोचला.

फोन कॉल्सची माहिती आली समोर पोलिसांनी मयत मैलारे याच्या फोन कॉल्सची माहिती घेतली. आपण वैष्णोदेवीला जाणार असून दसऱ्याला घरी येणार, असे त्याने आईला सांगितले होते. मात्र या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांसमोर खुनाच्या घटनेची उकल करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यात त्यांना यश आले. आरोपी बरबट याने खुनाची कबुली दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत...