spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच भाजपाने विजयाचे बॉम्ब फोडले? हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं काय...

काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच भाजपाने विजयाचे बॉम्ब फोडले? हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं काय घडलं पहा…

spot_img

Haryana Assembly Elections Result: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीवेळी अत्यंत रंजक परिस्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत मिळत होते. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरु केली होती. याठिकाणी काँग्रेसने जिलेबी वाटायला सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला दीड तास उलटल्यानंतर हरियाणातील मतमोजणीत एक ट्विस्ट आला.

सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात 60 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली आहे. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते.

भाजपने मतमोजणीत केलेले पुनरागमन हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून हरियाणात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती. याशिवाय, शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजपला आलेले अपयश यामुळे भाजपला हरियाणात फटका बसेल, असे बोलले जात होते. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजपने ही सर्व आव्हाने पार करत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे दिसत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला झुकते माप देण्यात आले होते. काँग्रेस राज्यात एकहाती सत्ता स्थापन करेल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता भाजप हरियाणात पुन्हा सत्तेत येईल, असे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील यश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उत्साह वाढवणारे ठरु शकते.

आता मतमोजणीच्या पुढील काही तासांमध्ये हे कल बदलणार का, हे पाहावे लागेल. मात्र, अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसचा पराभव झाल्यास पक्षासाठी तो मोठा धक्का ठरेल. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यास राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. हरियाणात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला का, हेदेखील आता पाहावे लागेल.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत असून, त्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. भाजप 48 तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. सीएम नायबसिंग सैनीपासून अनिल विजपर्यंत श्रुती चौधरीसारखे नेते मोठ्या विजयाच्या वाटेवर आहेत पण भाजपचा कोणता उमेदवार कोणत्या जागेवरून किती मतांनी विजयी झाला आहे.

विनेश फोगाट यांनी बाजी मारली
कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. भाजपाने जुलानामधून बैरागी यांच्या रुपाने एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पाटकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. 14 व्या फेरी अखेर विनेश फोगाट जुलानामधून 5557 मतांनी आघाडीवर होती.

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. ३७० कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढले होते. दरम्यान या निवडणुक्ती या दोन पक्षांच्या आघाडीने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत विजयी आघाडी घेतल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आहे.

केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसले असल्याचा उल्लेख देखील फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. लोकांनी आपला जनादेश स्पष्ट दिला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान मतमोजणीदरम्यान जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी २९ जागांवर भाजप तर ४७ जागांवर काँग्रेस आणि नॅशनल काँफ्रन्स यांच्या आघाडी मिळीली आहे. तर १३ जगांवर इतर आघाडीवर आहेत.

कोण किती जागांवर आघाडीवर?
भाजप २९
काँग्रेस ६
नॅशनल कॉन्फरन्स ४१
पीडीपी १
जेकेपीडीपी ४
इतर ८

फारूक अब्दुल्ला यांनी आपला मुलगा ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अशी घोषणा कली आहे. ओमर अब्दुल्ला य़ांनी बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवरून उमेदवारी दाखल केली होतीय बडगाम येथून ते निवडणूक जिंकले आहेत तर गांदरबल जागेवर देखील ते आघाडीवर आहेत.

हरियाणात मोठा उलटफेर; काँग्रेसचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतमोजणीदरम्यान मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसची आघाडी होती. यावेळी हरियाणात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असे मानले जात होते. पण, पुढच्या तासाभरातच आकडेवारी बदलली आणि भाजपने मोठी आघाडी घेतली. त्यामुळे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप सध्या आघाडीवर दिसत असल्याचे जयराम रमेश यांनी म्हंटले आहे.

याप्रकरणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, “आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार असून लोकसभा निवडणुकीवेळी हाच प्रकार घडला होता.”

हा भाजपचा माईंड गेम
पुढे ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. भाजप प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका उपस्थित होत आहे. पण स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. हा भाजपचा माईंड गेम आहे,” असे जयराम रमेश यांनी म्हटले.

तसेच त्यांंनी निवडणूक आयोगाने वेगाने आणि योग्य पद्धतीने निकालाची आकडेवारी जाहीर करावी, यामुळे जनतेचा विश्वास कायम राहील, असे आवाहनही केले आहे. सध्या हरियाणात भाजप 50 जागांवर, काँग्रेस 35 जागा, लोक दल 3 आणि अपक्ष उमेदवार हे 3 जागांवर आघाडीवर आहेत.

हरियाणात काँग्रेसला झटका, महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार?
हरियाणा निवडणुकीचे निकाल सुरू असून भाजप बहुतमताचा आकडा गाठताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला मात्र फारसा करिष्मा दाखवता आलेला नाही. काँग्रेस आघाडीला केवळ ३५ जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात असून काँग्रेसच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. हरियाणामधील पराभवचा परिणाम आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.

राजकीयदृष्ट्या उत्तर प्रेदशनंतर महाराष्ट्र देशातील महत्त्वाचं राज्य. त्यामुळे या राज्यांच्या निवडणुकांकडे नेहमीच देशातील जनतेचं लक्ष असतं. मागच्या काही काळात महाराष्ट्रासोबत झारखंडमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्याचा लोकसभेतील निवडणुकांवर परिणाम पहायला मिळाला. मूर्जीतावस्थेत गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आणि १०० आसपास जागा मिळाल्या. इंडिया आघाडीला २३५ चा आकडा गाठला आहे. यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेत काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हरियाणात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींना हरियाणात विजयाचा होता विश्वास
काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीत संपू्र्ण ताकद पणाला लावली होती. हरियाणात मोठा विजय मिळणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. १० वर्षांनंतर काँग्रेस हरियाणात पुनरागमन करले, अशी चर्चा होती. मात्र, भाजप हॅटट्रीक करत इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकते.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात अनेक वेळा दौरा केला आहे. अनेक सभांना संबोधित केले आहे. भाजपलाही महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत गमवायचं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी अत्यंत काट्याची लढत पहायला मिळणार आहे. भाजपला हरियाणामध्ये मिळणाऱ्या विजयामुळे महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही अधिक ताकदीने लढण्याची शक्यता आहे.

आगामी झारखंड निवडणुकीतही भाजपला मोठी अपेक्षा आहे. हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या आरोंपांवरून अटक झाली. राज्यात हिंदूंवर हल्ले झाले, लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आदिवासी गावांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे, त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजप या निवडणुकीत याच मुद्द्यांना धरून पूर्ण ताकदीने प्रचार करण्याची शक्यता आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढले आहेत. एकदा सत्ता हातातून गेली की झारखंडमध्ये पुन्हा सत्ता मिळवणं अवघड आहे. त्यामुळे भाजपला यावेळी झारखंडमध्ये विजयाच्या अपेक्षा आहेत. कॉंग्रेस मात्र झारखंडमध्ये बऱ्याचअंशी मागे आहे.

राहुल गांधींच्या निवडणूक रणनितीवर उठू शकतात प्रश्न
हरियाणामध्ये यावेळी काँग्रेसच्या विजयाचे दावे करण्यात आले होते. स्वतः राहुल गांधी अत्यंत सक्रिय होते. मात्र, या पराभवामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि हरियाणा काँग्रेस पुन्हा एकदा गटबाजी आणि अंतर्गत संघर्षाचा शिकार होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

हरियाणामध्ये भाजप मागील 10 वर्षांपासून सत्तेत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 90 पैकी 47 जागा जिंकून बहुमताचे सरकार स्थापन केले होते. त्या वेळी इंडियन नॅशनल लोकदलने 19 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये भाजपने दुष्यंत चौटालांच्या जेजेपी पक्षासोबत सरकार स्थापन केले होते. या निवडणुकीत भाजपला केवळ 40 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा 10 जागा जिंकणाऱ्या जेजेपीसोबत भाजपने आघाडी सरकार स्थापन केले होते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने 5-5 जागा जिंकल्या होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...