जुनी महापालिका येेथे अचानक भेट | कामावर नसलेल्या कर्मचार्यांवर कारवाई
अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिका कर्मचार्यांबाबत वारंवार येणार्या तक्रारी, उशीरा येणारे कर्मचारी यामुळे महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी जुन्या महापालिका कार्यालयातील विभागांना अचानक भेट देत कर्मचार्यांची झाडाझडती घेतली. कामावर हजर नसलेल्या कर्मचार्यांवर कारवाईच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात नागरिकांना वेळेवर जन्म व मृत्यूचे दाखले मिळत नाहीत अशा अनेक तक्रारी आयुक्त जावळे यांच्याकडे आल्या होत्या. त्याअनुषंगाने आयुक्तांनी जुनी महापालिका इमारतीमधील जन्म मृत्यू विभागास अचानक भेट देऊन कर्मचार्यांची झाडाझडती घेतली.
दाखले देण्यास उशीर का होताय याबाबत कर्मचार्यांची चर्चा केली. तसेच वेगवेगळ्या विभागात जावून कर्मचार्यांची झाडाझडती घेतली. कागदपत्रांची तपासणी केली. आयुक्तांनी दिलेल्या अचनाक भेटीमुळे कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आस्थापना प्रमुख लहारे उपस्थित होते. उशीरा येणार्या व कामावर हजर नसलेल्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या सुचना यावेळी आस्थापना प्रमुख लहारे यांना दिल्या.