spot_img
अहमदनगर‘खा. विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधानांचे हात बळकट करा’

‘खा. विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधानांचे हात बळकट करा’

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्क्याने आघाडी घेणार आहेत. त्या अनुषंगाने श्रीगोंद्यामधून एक लाख मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा आहे. त्यामुळे श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे. असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई नागवडे यांनी केले आहे.

महिला जिल्हाध्यक्षा नागवडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे. लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत. रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले.

पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे. पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....