spot_img
राजकारणजरांगे पाटलांच्या सभेला मदत केल्याची 'त्या' आमदार पुत्राची क्लिप व्हायरल, त्यानंतर 'त्या'...

जरांगे पाटलांच्या सभेला मदत केल्याची ‘त्या’ आमदार पुत्राची क्लिप व्हायरल, त्यानंतर ‘त्या’ सोबत आंदोलकांनी जे केलं…

spot_img

सोलापूर / नगर सह्याद्री :
एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या एका आमदार पुत्राला हैराण करून सोडलंय. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

झाल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी जे कृत्य सुरू केलं त्यानंतर मात्र तो पुरता हैराण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा करताना पंढरपुरात सभा घेतली. सोलापुरातील माढा मतदारसंघाचे आमदार, अजित पवार गटाचे बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी या सभेला आर्थिक मदत केली होती.

याबाबतचे बोलणे व्हायरल झाले आहे. ही मदत बोलून दाखविल्याने मराठा समाजाने वेगळेच आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजबांधवांनी आमदाराच्या मुलाला धडा शिकवण्याचा मार्ग शोधला आणि त्याला फोन पे वर १, २, ३ रुपये पाठवण्यास सुरवात झाली.

हे मेसेज आणि नोटीफिकेशन येऊन येऊन हा आमदार पूत्र पुरता त्रासला आहे. पंढरपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून रणजितसिंह शिंदे यांना फोनवरून पैसे पाठवले जात होते. रणजितसिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत.

मालोजी चव्हाण नावाच्या तरुणाने शिंदे यांना फोनवर विचारले असता त्यांनी जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पैसे पुरवले होते असे म्हटले आहे. या क्लिपवरून आता एक वेगळीच मोहीम सुरू झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...