spot_img
ब्रेकिंगविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मराठा आंदोलकांनी घातला घेराव, त्यानंतर..

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मराठा आंदोलकांनी घातला घेराव, त्यानंतर..

spot_img

दिंडोरी / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसून पुन्हा एकदा सरकारसमोर नवे आव्हान उभे केले आहे.

अनेक गावांमध्ये २५ ऑक्टोबरपासून पुढाऱयांना गाव बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दिंडोरी तहसील कार्यालयात भूसंपादनासंदर्भात झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना घेराव घालून आरक्षणाची मागणी केली.

झिरवाळ यांनी आपण मराठा समाजाच्या मागणी सोबत असून वेळप्रसंगी राजीनामा देवू असे सांगत शासनाकडे पाठपुरावा करू असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाकडून केली जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ४० दिवसांत सोडविण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे समाजाचा उद्रेक होत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारत सरकारला इशारा देत समाजाचे प्रश्न तीव्रतेने मांडत आहेत. त्यास पाठिंबा देत आज दिंडोरी येथे तहसील कार्यालयाच्या आवारात विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ आले असता त्यांना सोमनाथ जाधव, वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, नितीन मोरे, संपतराव शिंदे, सुनील शिंदे, दत्तात्रय जाधव, मंगेश जाधव, नितीन पवार, गणेश कामाले,

संदीप जाधव, गणेश आंबेकर, योगेश जाधव, सुनील पाटील, बापू जाधव, तुषार जाधव, सुदाम शिंदे, आदिसह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नामदार झिरवळ यांना घेराव घालत मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवावे अशी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...