spot_img
ब्रेकिंगपुन्हा शहर हादरलं! लॉजमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर?, प्रियकराने नंतर स्वतःला संपवलं..

पुन्हा शहर हादरलं! लॉजमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर?, प्रियकराने नंतर स्वतःला संपवलं..

spot_img

Crime News: शहरातील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रियसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे

अधिक माहिती अशी, पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉज मध्ये सदरची घटना घडली. गुरुवारी दुपारी नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसीसोबत या लॉजमध्ये आला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रियसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्रप्रेयसीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दोघांचे ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुक्यातील खळबळजनक प्रकरण; हायकोर्टाचा आदेश, १५ लाख ५१ हजार रुपये भरा…

पारनेर । नगर सहयाद्री:- चोंभूत (ता. पारनेर) येथील वाळू गटातून उत्खनन करता न आल्याने...

डाॅ. सुजय विखे पाटील म्हणाले ‘तो’ सोहळा ऐतिहसिक ठरणार!

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:- श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका – अन्यथा नंतर...

पारनेर नगराध्यक्षपदासाठी काथ्याकूट! महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का? नगराध्यक्षपदासाठी जायदा शेख, विद्या गंधाडे यांना संधी

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपदाच्या...