spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: नगर पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

Ahmednagar Crime: नगर पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
नगर शहर पुन्हा एका घटनेने हादरले आहे. किरकोळ कारणावरून दोन परप्रांतीय तरुण आपसात भिडले. एवढ्यावरच न थांबता एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोककुमार अमरजित (रा. बसोली बु. बासगाव, जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. तर संशयित आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा (रा. बांकी, शेजवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी: अशोककुमार अमरजित, प्रमोद दीपचंद विश्वकर्मा हे परप्रांतीय तरुण शेती कामासाठी विश्वास रंगनाथ डांगे (वय ४५ रा. ढोर गल्ली, माळीवाडा) यांच्या शेतात आले होते. ते त्याच ठिकाणी पत्र्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्यात मंगळवारी रात्री किरकोळ वाद झाले.

या वादातून प्रमोदने अशोककुमारच्या डोक्यात दोन ते तीन वेळा दगड घालून त्याची हत्या केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

संशयित आरोपी विश्वकर्मा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपअधीक्षक भारती, निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार सतीश भांड, दीपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिदे, सुरज कदम, शाहीद शेख, अतुल काजळे, प्रमोद लहारे, अमोल गाडे, राहुल गुड्डू यांच्या पथकाने विश्वकर्मा याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...